By Milind Mane

Twitter: @manemilind70

मुंबई: औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये सध्या तू तू मैं मैं सुरूअसतानाच आज मुंबईतील माहीम विभागात उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचे फोटो असलेले बॅनर्स लागल्याने (Banner of Aurangzeb with Uddhav Thackeray and Prakash Ambedkar) मुंबईत तणावपूर्ण वातावरण होण्याअगोदर शिवसैनिकांनी तात्काळ हे बॅनर काढून टाकले. मात्र, यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते व माजी खासदार प्रकाश आंबेडकर VBA Leader Prakash Ambedkar) यांनी औरंगाबादच्या खुलताबाद येथे जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवला. यावरून राज्यात मोठे वादंग निर्माण झाले. आंबेडकरांच्या या कृतीवरून भाजपने (BJP Alleges Prakash Ambedkar) प्रकाश आंबेडकरांवर टीका करून ही कृती मान्य आहे काय याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावे, असे खुले आव्हान भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. तशात मुंबईत लागलेल्या बॅनरमुळे मोठी खळबळ उडाली. हे बॅनर कोणी लावले याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने हे बॅनर लावल्याचे बोलले जात आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली. या बॅनरमुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा (law and Order) प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बॅनर्सबाबत शिवसेनेकडून वा अन्य कोणी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली नसली तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या बॅनर्समुळे मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.

या बॅनरवरील भाषा अत्यंत आक्षेपार्ह होती. औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे…. शिवरायांची जनता, असं या बॅनरवर लिहिण्यात आल् आहे तसेच#uddhavthackeryforaurangzeb असा हॅशटॅग या बॅनरवर वापरण्यात आला. या बॅनरवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो वापरण्यात आला आहे.

मागील आठवड्यात प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबादला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी औरंगजेबाच्या थडग्यावर फुले वाहून डोके टेकले. त्यानंतर त्यांनी भद्रा मारुती मंदिरात जाऊन दर्शनी घेतले होते. मात्र आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहिल्याने राज्यातील भाजप व शिंदे गटाकडून यावर त्रिव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. 

दरम्यान, माहीम पोलीस स्टेशनमध्ये सीआर नंबर 348/ कलम 505 (2) ipc. महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 कलम तीन अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here