हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन एम्प्लॉइज युनियन संघटनेचा विरोध

Twitter: @maharashtracity

मुंबई: हाफकिनमधील लस साठा होत असलेल्या गोदामांची १ हजार ८२६ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आयसीएमआर म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेला देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, हाफकिन महामंडळाची Haffkine Institute for Training, Research and Testing) अशी जागा देऊन हे महामंडळ संपविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप येथील कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यामुळे ही जागा देण्यास विरोध दर्शविण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

दरम्यान, यापूर्वी २०१२ या वर्षात काही जागा टाटा मेमोरिटल रुग्णालयाला (Tata Memorial Hospital) दिली असल्याचे उदाहरण देत कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे वारंवार जागा देत महामंडळच बंद करण्याचा निर्णय घेतील, अशी भिती देखील व्यक्त केली. या जागेच्या बदल्यात टाटा मेमोरिअल दोन टॉवर बांधून देणार असल्याचे ठरले होते. प्रत्यक्षात हाफकिन महामंडळाच्या (Haffkine Corporation) हाती काहीच लागले नाही. अशा पद्धतीच्या जमीन हस्तांतरणाची उदाहरणे देत हाफकिन महामंडळाकडे जमीनच उरणार नाही. एक दिवस हे महामंडळ बंद करतील अशी चिंता देखील यावेळी व्यक्त करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी १ हजार ८२६ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आयसीएमआरला (ICMR) देण्याचा निर्णय घेतला. मात्र जागा हस्तांतरित करण्याबाबत हाफकिन महामंडळाला अंधारात ठेवण्यात आले असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. दरम्यान, ज्या जागेत लसींचे गोडाऊन आहेत अशा ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार मोकळी जागा हवी. ती जागा विकली गेल्यास अशा वैज्ञानिक नियमांचे उल्लंघन होणार आहे. शिवाय डॉ. रघुनाथ माशेलकर समितीने (Dr Raghunath Mashelar Committee) याआधीच हाफकिन महामंडळाच्या आवारात बायोटेक हबची (Biotech Hub) निर्मिती करण्याबाबत सुचवले आहे. त्यासाठी हाफकिन महामंडळालाच जागा हवी आहे. असे सांगत हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन एम्प्लॉइज युनियनने जागा देण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here