@maharashtracity
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंंविरुध्द भाजपचे आंदोलन
धुळे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या (MPCC President Nana Patole) निषेधार्थ मंगळवारी भाजपने आंदोलन (BJP staged protest) केले. यावेळी पटोलेंच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर एका लहान मुलाकडून लघुशंका (pee by a child) करवून भाजपने पटोलेंविरुध्द जोरदार घोषणाबाजी केली.
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह वकत्व करुन आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. देशाच्या पंतप्रधानांचा ते अपमान करीत असल्याने नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची टिका भाजपने केली. अशा मनोवृत्तीचा निषेध करण्यासाठी भाजपने शहरातील गुरुशिष्य स्मारकाजवळ एका लहान मुलाला बोलवून पटोले यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर त्याला मुत्र विसर्जन करण्यास सांगितले.
यावेळी भाजपाचे नगरसेवक हिरामण गवळी, नगरसेवक अमोल मासुळे, दगडू बागुल, भगवान देवरे, प्रशांत बागुल, दिनेश बागुल, कल्पेश थोरात, राजेश शहा, सुरेश अहिरराव, पवन जाजू यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.