@maharashtracity
धुळे: बनावट कोरोना लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा (fake corona certificate scam) प्रकरणात धुळे पोलिसांनी काँग्रेसचा कार्यकर्ता जावेद शेख हुसन्नोद्दीन उर्फ जावेद मल्टी याला अटक केली आहे.
त्याने अनेकांना बनावट लसीकरण प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचा त्याच्यावर संशय आहे.
बनावट करोना लसीकरण प्रमाणपत्र घोटाळ्यात आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरेसह सहा जणांना अटक झाली होती. त्या सर्वांची जामीनावर मुक्तता झाली आहे. पोलीस (Dhule Police) या प्रकरणातील कथीत दलालांचा शोध घेत असताना संशयित जावीद शेख हुसन्नोद्दीन उर्फ जावेद मल्टी हा 80 फुटी रोडवरील सार्वजनिक हॉस्पीटलच्या परिसरात आल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार सोमवारी रात्री पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोकॉ. सतीश कोठावदे, विलास भामरे, मुख्तार मन्सुरी, निलेश पोतदार, शाखीर शेख यांनी जावेद मल्टी याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली. दरम्यान, या प्रकरणात गायब असलेला वसीम बारी व पठाणचा पोलीस शोध घेत आहेत.