मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य सचिवांना निर्देश

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे सक्त निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे मुख्य सचिवांना दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली.

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे. बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकताहेत की नाही ते तपासावे. बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास अशांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता काटेकोर कारवाई करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशात नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here