@vivekbhavsar

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत (Degloor by-election) भारतीय जनता पक्षाने शिवसेनेतून आयात केलेले माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली आहे. साबणे यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होण्याआधीच भाजपने ही उमेदवारी जाहीर केली आहे. (BJP announced Subhash Sabane as party candidate)

काँग्रेसकडून (Congress) दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जीवेश यांना उमेदवारी दिली जाईल, अशीच शक्यता आहे. या पोट निवडणूकीला तिसरा कोन आहे आणि तो म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी. (VBA of Prakash Ambedkar) या आघाडीचा उमेदवार जितकी जास्त मते घेईल, तेवढा काँग्रेसचा प्रवास पराभवाकडे होईल, अशी शक्यता आहे.

कॉंग्रेसचे आमदार (दिवंगत) रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचे कोविड पश्चात आजारामुळे निधन झाले. त्यामुळे देगलूर येथे विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. यासाठी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. काँग्रेसने अजूनपर्यंत पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर केला नसला तरी दिवंगत आमदार अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश यांनाच ही उमेदवारी जाईल अशी शक्यता आहे

काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव सातव (Rajeev Satav). यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत (Dr Nitin Raut) हे नांदेड येथे मुक्कामी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी जितेश अंतापूरकर यालाच उमेदवारी दिली जाईल,असे स्पष्ट केले होते.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचाही याच नावासाठी आग्रह असून नाना पटोले यांचीही संमती असल्याचे थोरात यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यामुळे जितेश अंतापूरकर यांच्या उमेदवारीची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे म्हटले जाते.

देगलूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव (SC reserved constituency) असलेला मतदारसंघ आहे. रावसाहेब अंतापूरकर यांनी आलटून पालटून दोन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले. अत्यंत सामान्य कुटुंबातील असलेल्या अंतापूरकर यांनी अखेरपर्यंत अशोक चव्हाण यांचे नेतृत्व आणि शब्द मान्य केला.

अंतापूरकर विधानसभेचे आमदार होते. तरीही त्यांच्या मतदारसंघाचे सर्व कामे अशोक चव्हाण यांचे विश्वासू आणि विधान परिषद सदस्य अमर राजूरकर (Amar Rajurkar) हेच बघत होते. दरम्यान, वडिलांच्या निधनापर्यंत राजकारणाशी संबंध नसलेले त्यांचे पुत्र जितेश हे वडिलांच्या निधनानंतर राजकारणात सक्रिय झाले आहेत.

दुसरीकडे, भाजपने उमेदवारी दिलेले सुभाष साबणे (Subhash Sabane) यांनी याच मतदारसंघाचे दोन वेळा शिवसेनेकडून (Shiv Sena) प्रतिनिधित्व केले आहे. प्रत्येक वेळी अमरापूरकर विरुद्ध साबणे असाच सामना व्हायचा. सन 2019 च्या निवडणुकीत साबणे पराभूत झाले.

राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आहे. (MVA government) देगलूरची जागा काँग्रेसची असल्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असेल हे स्पष्ट होते. शिवसेनेच्या साबणे यांना उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने त्यांच्यापुढे सेना सोडण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

भाजपने हीच संधी साधली आणि पंढरपूर पोटनिवडणूकीप्रमाणे (Pandharpur by-election) आयात केलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची रणनीती भाजपने आखली. म्हणूनच पक्षप्रवेश होण्याआधीच साबणे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली.

देगलूर मतदारसंघात देगलूर आणि बिलोली हे दोन तालुके आहेत. यापैकी बिलोलिमध्ये साबणे यांचे प्रचंड वर्चस्व आहे. साबणे यांनी त्यांच्या चिरंजीवांच्या मदतीने देगलूर मतदारसंघ बांधून ठेवला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत सेनेची म्हणजे साबणे यांची स्वतःची मते आणि भाजपची मते याचे समीकरण जुळून आल्यास साबणे यांना ते फायदेशीर ठरणार आहे.

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने नांदेड मतदारसंघात तब्बल पाऊणे दोन लाख मते घेतली होती. त्यामुळे अशोक चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला होता.

Also Read: Rajani Patil could be the dark horse for the Rajya Sabha seat

आंबेडकरांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर निर्माण केलेली आघाडी आणि उमेदवारांची शोधाशोध अशी बिकट परिस्थिती असतानाही आंबेडकरांच्या आघाडीने सगळीकडेच मोठी मुसंडी मारली होती.

देगलूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असला आणि दलित समाजाची मोठी मते असली तरीही लिंगायत समाज (Lingayat community) या ठिकाणी निवडणुकीवर प्रभाव टाकतो. हा समाज ज्या पक्षाकडे जातो, त्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो.

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष शिवकुमार नारंगळे हा लिंगायत समाजाचा असून मागच्या वेळी त्याने देगलूर शेजारील लोहा विधानसभा मतदारसंघात 31000 पेक्षा जास्त मते घेतली होती. नारंगळे यांनी ताकद लावली आणि लिगायत समाजाची काही मते वंचितकडे वळवली तर त्याचा फटका काँग्रेससोबतच भाजपलाही बसेल.  पण, लोकसभा निवडणुकीप्रमाणे वंचित आणि भाजपाची छुपी युती झाल्यास काँग्रेसला जास्त फटका बसू शकेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीने पक्ष बांधणीवर भर दिला आहे. शस्त्रक्रियेनंतर प्रकाश आंबेडकर यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागत असली, तरी त्यांच्या पत्नी आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष गेल्या काही दिवसांमध्ये अनेक वेळा देगलूरमध्ये येऊन गेल्यात. या आघाडीने उमेदवार दिला तर त्याला जितकी जास्त मते मिळतील, तेवढी काँग्रेसची मते कमी होतील आणि सहाजिकच भाजप उमेदवाराला त्याचा फायदा होईल, असे स्थानिक जाणकारांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here