@maharashtracity
मुंबई: साधारण पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील चार मंत्र्यांच्या निकटवर्तीय व्यक्ती आणि संस्थावर धाडी टाकल्यावर इन्कम टॅक्स विभागाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तिशाली नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केले आहे. पवार यांच्या बहिणी आणि अन्य नातेवाईक यांच्या घरासह पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यावर छापे टाकण्यात आले आहेत. (IT raids on close relatives of Ajit Pawar)
बहिणीकडील छाप्याचे दुःख: अजित पवार
आपल्या कुटुंबात व्यस्त असलेल्या आणि व्यवसायाशी सबंध नसलेल्या आपल्या बहिणींच्या घरी इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकले, याचे वाईट वाटते, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
छापे टाकणे हे त्यांचे काम आहे, पण केवळ माझे रक्ताचे नातेवाईक म्हणून छापे टाकले जात असतील तर जनतेनेच याचा विचार करावा. या संस्थांचा वापर कशा पद्धतीने केला जात आहे, याचा विचार जनतेने करावा, असे पवार पुढे म्हणाले.
पवार यांनी संगीतले की ते नियमित टॅक्स भरतात, पण इन्कम टॅक्स विभागाला जर काही माहिती मिळाली असेल तर छापे टाकण्याचा अधिकार इन्कम टॅक्स विभागाला आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State president Jayant Patil) यांनी या धाडीचा सबंध महाविकास आघाडी (MVA) सरकारने लखीमपूर येथील शेतकरी चिरडण्याच्या घटनेचा निषेध करण्याचा निर्णय घेतल्याशी केला. भाजप सरकारच्या कृत्याचा निषेध केला म्हणून या धाडी टाकण्यात आल्या.
Also Read: राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई
कुठे पडल्या धाडी?
पवार यांच्याशी संबंधित असलेले जरंडेश्वर साखर कारखाना, सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) सर्वेसर्वा असलेली डायनमिक्स दूध डेअरी, दौंड साखर कारखाना, नंदुरबार येथे अजित पवार यांनी विकत घेतलेला पुष्पदंतेश्वर साखर कारखाना आणि आयन मल्टी ट्रेंड, या कंपनीवर आज सकाळी एकाच वेळी धाड टाकण्यात आली.
याआधी को कोणावर धाडी पडल्या?
दरम्यान, 23 सप्टेंबर रोजी इन्कम टॅक्स विभागाने चार मंत्र्यांच्या निकटवर्तीय व्यावसायिक हितसंबंधितांवर धाडी टाकल्या होत्या. ज्यांच्यावर धाडी पडल्या होत्या ते शिवसेनेचे सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय होते, असे सांगितले जाते.