Twitter : @NalavadeAnant

मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धव ठाकरे यांच्या गटाला युतीचा प्रस्ताव पाठवला (MNS gives proposal of alliance to Uddhav Sena) असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला असल्याचं सूत्रांंनी सांगितलं. यामध्ये लक्षात घेण्यासारखी बाब आहे की “ठाकरे” सिनेमा तयार करत असताना खासदार संजय राऊत आणि अभिजीत पानसे यांचा यामध्ये सहभाग होता. परंतु काही कारणामुळे चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळेस वितृष्ठ निर्माण झाले होते.

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडमोडी घडत आहेत. अजित पवारांनी बंड (rebel by Ajit Pawar in NCP) केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं भगदाड पडलं आहे. अजित पवार भाजपा – शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटामध्ये नाराजीचा सूर देखील पाहायला मिळत आहे.

अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. एकीकडे राज्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. असेच काहीसे दृश्य राऊत – पानसे भेटीमुळे समोर येत आहे.

राज – उद्धव या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटासोबत युती करावी, असा सूर मनसेच्या बैठकीतही लावला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here