Twitter : @ManeMilind70

मुंबई: अजित पवारांसह राष्ट्रवादी कॉँग्रेससच्या आठ आमदारांनी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमध्ये (Shinde – Fadnavis govt) मंत्रीपदाची शपथ घेतली. या आमदारांसह राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित (Parful Patel and Sunil Tatkare suspended ny NCP) करण्याचा ठराव केंद्रीय कार्यकारणीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे – पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे व अनिल भाईदास पाटील या आमदारांसह राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कार्यकारिणीची घेतली. या बैठकीवर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते व नव्याने शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांनी या बैठकीवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यासंदर्भात निवडणूक आयोगात यापूर्वीच याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष महाराष्ट्रात पुन्हा परत आल्यानंतर काय घडामोडी घडतात यावरच महाराष्ट्राचे राजकारण ठरणार आहे. 

कामकाज सल्लागार समितीची उद्या बैठक!

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी (Monsoon Session) उद्या विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची (Business Advisory Committee – BAC)) बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार, छगन भुजबळ व शरद पवार गटाकडील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पूर्वीपासून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत समावेश आहे. मात्र उद्या होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे तिन्ही नेते एकत्र येतात का? यावर पुढच्या घडामोडी उद्या पाहण्यास मिळतील. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here