@maharashtracity

विधान परिषद निवडणुकीची पूर्वतयारी

मुंबई: विधानपरिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फत म्हणजे मुंबई महापालिकेतून (BMC) दोन आमदार निवडून पाठविण्यासाठी येत्या १० नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. भाजपचा (BJP) उमेदवार भरघोस मतांनी विजयी होण्यासाठी व भाजपात दगाफटका होऊ नये यासाठी पूर्वतयारीचा भाग आणि रणनीती (election strategy) समजावून सांगण्याकरिता बुधवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बंगल्यावर पालिकेतील भाजप नगरसेवकांची विशेष बैठक पार पडली.

मात्र निमित्त होते ते रात्रीच्या सन्हेभोजनाचे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पालिकेतील भाजपचे नेते, नगरसेवक उपस्थित होते.

भाजपने मुंबई पालिकेतून विधान परिषदेकरिता काही इच्छुकांना डावलून माजी आमदार राजहंस सिंह (Raj Hans Singh) यांना तर शिवसेनेनेही (Shiv Sena) माजी आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) यांना उमेदवारी दिली आहे.

मात्र, ऐनवेळी काँग्रेसमधील (Congress) सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

वास्तविक, निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान ७७ मते मिळणे आवश्यक आहे. शिवसेनेकडे ९९ तर भाजपकडे ८३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. तर काँग्रेसकडे ३० नगरसेवक आहेत. तसेच, समाजवादीकडे ६ (Samajwadi Party) , एमआयएम -२ (AIMIM) तर मनसेकडे १ (MNS) नगरसेवक आहे.

शिवसेना व भाजप यांचे संख्याबळ पाहता त्यांचे उमेदवार सहजपणे जिंकून येणे शक्य आहे. मात्र राजकारणात गाफील, बेफिकीर राहून चालत नाही. दगाफटका होऊ नये यासाठी सतत सतर्क व सावध राहावे लागते.

सुरेश कोपरकर (Suresh Koparkar) यांनी जरी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला असला तरी त्यांना काँग्रेस नगरसेवकांचा छुपा पाठींबा आहे. त्यांना जर या निवडणुकीत बाजी मारायची असेल तर संख्याबळ अधिक असलेल्या भाजपचे नगरसेवक फोडायला लागतील. तरच त्यांच्या मतांची गोळाबेरीज होण्यास त्यांना भरीव मदत होऊ शकणार आहे.

विधानपरिषदेच्या या निवडणुकीत गुप्त मतदान होणार असल्याने कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजप विशेष काळजी घेत आहे. हीच अवस्था शिवसेनेची आहे.

भाजपने या निवडणुकीसाठी अगोदरच रणनीती तयार केली असून त्याबाबत माहिती देण्यासाठीच बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजप नगरसेवकांची विषेश बैठक घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here