@maharashtracity

भाजप आमदार राम सातपुते यांचा संजय राऊत यांना सवाल

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित बांधवांचे पाय धुतले याचा संदर्भ घेऊन मोदी यांच्यावर टीका करणारे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Shiv Sena Spokesperson Sanjay Raut) यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांनी सडकून टीका केली आहे. राऊत ज्या पक्षात आहेत, त्या शिवसेनेने आतापर्यंत किती दलित बांधवाना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, याचा जाब आमदार सातपुते (BJP MLA Ram Satpute) यांनी विचारला आहे.

सातपुते म्हणाले, संजय राऊतांनी काल नेहमी प्रमाने आपला तोंडपट्टा चालवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दलीत बांधवाचे पाय धुतले याचा संदर्भ देत राऊत यांनी टिका केली. भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सर्वच समाजाचा मिळणारा प्रतिसाद व विश्वास पाहता यांच्या पायाखालची जमिन सरकली आहे, अशा शब्दात सातपुते यांनी राऊत आणि सेनेला उत्तर दिले आहे.

संजय राऊतांनी दलितांच्या (Dalit) शोषितांच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असाही टोला माळशिरस मतदार (Malshiras constituency) संघाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या या तरुण आमदाराने लगावला.

सातपुते म्हणाले, “संजय राऊंताच्या पक्षात जेवढ्या आमदारांची (MLAs) संख्या आहे, त्यापेक्षा जास्त दलित बांधव खासदार (MPs) म्हणून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तिकीटावर निवडून आले आहेत. म्हणूनच आमच्या जे पोटात आहे तेच ओठात आहे आणि तेच आमच्या कर्तृत्वात आहे.”

त्यामुळे संजय राऊतांनी काँग्रेसला (Congress) खुष करण्यासाठी आम्हाला ज्ञान पाजाळू नये, असा सल्ला देतांनाच राऊत यांच्या पक्षाने किती दलित बांधवांना प्रतिनिधित्व दिलं, हे जाहीर करावं, असे खुले आव्हान राम सातपुते यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here