सामाजिक न्याय विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणार्‍या अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीनंतर दिली.

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अधीक्षकांना आता 9200 ऐवजी दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. ही वाढ दिनांक एक जुलै २०२१ पासून लागू होणार आहे.

स्वयंपाकी पदासाठी 6900 ऐवजी 8500 रुपये तर मदतनीस व चौकीदार पदांसाठी 5750 ऐवजी 7500 मानधन मिळणार आहे.

या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील 2388 अधीक्षक, 2868 स्वयंपाकी , 470 मदतनीस, 2388 चौकीदार यांना लाभ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here