Twitter : @maharashtracity

जळगाव: “शासन आपल्या दारी” कार्यक्रमासाठी जळगावात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कापसाला भाव मिळावा या मागणीसाठी घेरण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. मात्र, फडणवीस यांच्या वाहनाचा ताफा येण्याआधीच जळगाव पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पक्ष कार्यातून ताब्यात घेतले. यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या ऍडव्होकेट रोहिणी खडसे यांच्यासह अन्य महिलांना बळाचा वापर करून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना दुपारी सोडून देण्यात आले.

कापसाला सहा हजार रुपये अनुदान मिळावे यासह जिल्ह्यातील प्रलंबित सुटावे, या मागणीसाठी जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचे तसेच काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली होती. पोलिसांना याची खबर लागल्याने राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी येण्याआधीच पोलिसांनी एडवोकेट रोहिणी खडसे यांच्यासह मंगला पाटील, वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी, रिंकू चौधरी यांना भर बैठकीतून बळाने उचलून नेले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीदेखील झाली. दुपारनंतर या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.

दुसरीकडे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे देखील पक्ष कार्यालयात एकत्र आले होते. कार्यालयात बसून सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देत होते. थोड्यावेळाने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना तेथेच रोखून धरले. फडणवीस यांचा वाहनाचा ताफा आला आणि आंदोलनकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले, तसेच काळी रिबीन बांधलेले फुगे आकाशात सोडले. फडणवीस गाडीतूनच या आंदोलकांकडे बघितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा येताच आंदोलकांनी पुन्हा एकदा काळे झेंडे दाखवून निषेध केला.

अण्णा गोट यांची टीका
एकनाथ खंडसे यांच्या कन्येला पोलिसानी ताब्यात घेतल्याने भाजपचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे धुळ्यातील नेते अण्णा गोटे चांगलेच संतप्त झाले. आज अटल बिहारी वाजपेयी असते तर त्यांच्या डोळ्यात अश्रु आले असते असे गोटे म्हणाले. फडणवीस यांच्यावर टीका करताना अण्णा गोटे म्हणाले की, आत्मघात करून घेण्याची तुमच्या शक्तीत करून घेतेलेली वाढ विस्मयकारक आणि अचंबित करणारी आहे. तुम्हाला आता वेगळ्या शतरूनची आवश्यकता नाही. श्रीमती इंदिरा गांधी यांनीही अशीच दडपशाही केली होती, देशातील जनतेने त्यांची राजवट उलथून टाकली होती, याकडे अण्णा गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here