प्रदेश राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल

@maharashtracity

By अनंत नलावडे

मुंबई: विद्यमान सरकारने पुढची कामे पूर्ण करायची असतात. मात्र मागची कामे थांबवणे किंवा स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मागच्या वर्ष – दीड वर्षात जे निर्णय वेगवेगळ्या ग्रामपंचायतीसाठी घेतले गेले किंवा महाराष्ट्रातील हजारो गावांना जो निधी दिला गेला, तो थांबवण्याचे काम (given stay to allocate funds) या सरकारने केले. त्यामुळे त्या गावांची प्रगती थांबली, प्रगतीत अडथळा निर्माण केला, असा थेट आरोप पाटील यांनी केला. हे सरकार मागे बघायला लागले तर ते कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे या सरकारने मागे न बघता पुढचा विकास म्हणजे भविष्याकडे बघून चालावे, असा सल्लाही पाटील यांनी दिला.

मागच्या वर्ष – दीड वर्षात झालेल्या कामांना वर्कऑर्डर दिली किंवा नाही दिली याच्या खोलात जाऊन आपला काल अपव्यय करण्यापेक्षा मागची कामे पूर्ण करावी आणि पुढची नवीन कामेही करायला काहीच अडचण नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi government) काळात एमआयडीसीतील भूखंड वाटपालाही (MIDC plot allotment) स्थगिती दिली असून ती स्थगिती कोणत्या उद्देशाने दिली, त्यामागे कोणता हेतू होता हेही तपासले पाहिजे. कारण एखाद्या उद्योजकाला भूखंड दिला तर तो पटापट पुढची कामे करायला लागतो आणि राज्यातील लोकांना नोकर्‍या व रोजगाराची (employment) संधी मिळते याचे भान या सरकारला नाही असेही खडेबोल पाटील यांनी सुनावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here