मुंबई
भाजपसोबत (BJP) सत्तेत जाण्याचा डाव मांडलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) विधिमंडळ गटनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत किती आमदार आहेत, याची चाचपणी सुरू असतांना TheNews21 च्या हाती नऊ आमदारांची यादी हाती लागली आहे. ही बातमी पोस्ट होईल तोपर्यंत हे 9 आमदार खाजगी (chartered) विमानाने दिल्लीत पोहोचलेले असतील.


पवार यांनी आज सकाळी 8 वाजता राजभवन येथे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या भाजप- अजित पवार गट सरकारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडात राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार सहभागी आहेत, याबाबत पक्षाकडून शोध मोहीम सुरू झाली. 
या बडखोर आमदारांना पक्षांतर बंदी कायदा लागू होईल, त्यांना राजीनामा देऊन नव्याने निवडणूक लढवावी लागेल आणि आम्ही तिघे पक्ष मिळून त्यांना पराभूत करू, असा इशारा पक्षाध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांनी दिला.


दरम्यान, संदीप क्षीरसागर, डॉ राजेंद्र शिंगणे आणि अन्य एका आमदाराने आपली फसवणूक झाली आणि खोटी माहिती देऊन राजभवन येथें नेण्यात आले, अशी कबुली प्रसार माध्यमांसमोर दिली. तरीही नऊ आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असवा, असे दिसते आहे.


हे आहेत ते 9 आमदार

  1. दौलत दरोडा (शहापूर, ठाणे)२. नरहरी झिरवळ (दिंडोरी, नाशिक)3. सुनील भुसारा (विक्रमगड, पालघर)४. दिलीप बनकर (निफाड, नाशिक)५. अनिल भाईदास पाटील (अमळनेर)६. नितीन पवार (कळवण, नाशिक)७. सुनील शेळके (मावळ, पुणे)८. बाबासाहेब पाटील (अहमदपूर, लातूर)९. संजय बनसोड (उदगीर, लातूर)


या आमदारांना रिलायन्स ट्रान्सपोर्ट अँड ट्रॅव्हल्स प्रा ली या कंपनीच्या माध्यमातून खाजगी विमानाने दुपारी २.३० वाजता दिल्लीकडे पाठवण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here