विवेक भावसार

मुंबई

“(धनंजय) मुंडे (Dhananjay Munde) साहेबांना एक महत्वाचा कॉल येतोय. त्यांना बोलायचे आहे.” प्रशांत जोशी, मुंडे यांचे स्वीय सहायक यांनी हा निरोप दिला आणि आम्ही आमची तासभर चाललेली बैठक/चर्चा संपवली. मुंडे यांचा बांगला सोडला तेव्हा रात्रीचे ९ वाजले होते. प्रेस रूम मध्ये जाऊन बॅग घ्यायची आणि स्टेशन गाठून ट्रेन पकडायची हा आमचा प्लॅन होता.

धनंजय मुंडे यांनी आपल्याला खूप आतली राजकीय महिती दिली आहे, उद्या सकाळी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे (Shiv Sena – NCP – Congress) नेते राज्यपाल (Governor) भगतसिंह कोशयारी (Bhagat Sinh Koshyari) यांना भेटून सत्ता स्थापन करण्याचा दावा दाखल करतील, त्याआधी सकाळी मस्त बातमी द्यायची, असे मनातल्या मांडे खात, आनंदात मंत्रालयात गेलो. सकाळी पत्नीने उठवले ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा शपथविधी झाल्याची बातमी देऊन. माझी झोप उडाली आणि आश्चर्याचा मोठा धक्का बसला. रात्री ९ वाजता धनंजय मुंडे यांना कोणाचा महत्वाचा कॉल आला होता, त्याचा उलगडा सकाळी बातमी बघितल्यावर झाला आणि राजकारण किती अनिश्चित असते, याचा पडताळा आला.

ही नाट्यमय घडामोडी घडण्याआधी मुंडे यांना भेटणारे आम्ही चौघे शेवटचे पत्रकार असू, पण आम्हालाही रात्री काही नाट्य घडणार आहे, याचा थांगपत्ता लागला नाही.


राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती असल्याने आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी चॅनेलच्या पत्रकारांना तंबी दिल्यानंतर कोणताही राजकीय नेता उघडपणे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारण्यास तयार नव्हता. पण, सत्ता बदल होतोय असे चित्र निर्माण झाल्याने काही अधिकारी ‘बातम्या’ देऊ लागले होते. कुठल्या खात्यात काय गडबड आहे, याची ‘hint’ मिळत होती.जे राजकीय नेते भेटतील, बोलतील त्यांच्याशी बोलून आतल्या खबरी काढण्याचे काम सुरूच होते.


शुक्रवारी चांगलाच योग होता. तिन्ही पक्ष नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पवार आणि काँगेस नेत्यांची बैठक संपवून मातोश्रीकडे रवाना झाले होते.


आम्ही चौघे पत्रकार विधान परिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या डॉ नीलमताई गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्याकडे बसलो होतो. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा संदेश आला की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. आनंदात नीलम ताई यांनी आम्हाला गोऱ्हे style ने पेढे दिले. तिथून बाहेर पडलो तर धनंजय मुंडे बंगल्यात असल्याचे समजले. 


मुंडे यांच्यासोबत राजकीय परिस्थितीवर चर्चा झालीच, पण त्याही पेक्षा चांगली चर्चा सरकार पुढील आर्थिक आव्हाने आणि ती कशी सोडवणार यावर झाली. या चर्चेतून एक मुद्दा लक्षात आला की मुंडे हे कृषी मंत्री झाले तर शेतकऱ्यांना निश्चितच न्याय मिळेल. 


शिवसेनेने दहा रुपयांत थाळी आणि संपूर्ण कर्जमाफी ही अश्वासने वचननाम्यात दिल्या आहेत. सरकार आले असते तर या अश्वासनाची पूर्तता करणे ही सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या सरकारची प्राथमिकता राहिली असती. यातून राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक बोजा आणि त्यातून कसा मार्ग काढायचा याचा मास्टर प्लॅन मुंडे यांच्या डोक्यात होता. 


याच मुद्द्यावर आम्ही नीलम ताई यांच्याशी चर्चा केली होती. उद्धव ठाकरे यांनी यावर पूर्ण विचार केलेला आहे, पण सरकार स्थापन करण्याआधी उत्तरे उघड केली तर विषय भरकटेल आणि मूळ योजना बाजूला राहील ही भीती उद्धव यांना वाटत असल्याचे निलमताई यांनी सांगितले. येत्या काही दिवसात उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणारच आहेत आणि त्यांचे सरकार आले की त्यांना हा प्रश्न विचारू असे आम्ही ठरवले आणि बाहेर पडलो होतो.


मुंडे यांच्या बोलण्यातून एक मुद्दा सारखा पुढे येत होता की काँग्रेसला अजून किती पदे हवी आहेत, हेच कळत नाहीये. मुंडे यांनी संगीतले की सेनेला मुख्यमंत्रीपदासह 16 पदे (11 कॅबिनेट व 4 राज्यमंत्री), राष्ट्रवादीला 15 पदे (11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री) आणि कॉंग्रेसला 13 पदे (9 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री) अशी पदे देण्याचा निर्णय झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस ने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती, अशीही माहिती त्यांनी दिली.


जवळपास तासभर चाललेल्या या चर्चेला प्रशांत जोशी यांच्या एका वाक्याने ब्रेक दिला. मुळातच सदैव हसमुख असलेले प्रशांत यांनी हसतच येऊन संगीतले की एक महत्वाचा कॉल येतोय आणि साहेबांना बोलायचे आहे. त्यांच्या चेहऱ्यावर जास्तीचे हास्य का होते याचा उलगडा शनिवारी सकाळी झाला. मोनालीसा च्या चेहऱ्यावरील हास्याचे रहस्य जसे आजही कायम आहे, तसे प्रशांत यांचे हास्य आज रहस्यमय वाटते. त्याचा अर्थ तेव्हाच कळला असता तर? मुंडे यांचा कॉल होईपर्यंत थांबलो असतो तर? पुन्हा त्यांच्याशी बोलता आले असते तर? 


या जर तर च्या प्रश्नांना काही अर्थ नाही. मुंडे बोलले नसते. त्यांनी काहीही उघड केले नसते हेच सत्य आहे. पण, आम्ही बाहेर पडक्यानंतर सुरू झालेले राजकिय नाट्य पहाटेपर्यंत सुरू होते आणि माझी exclusive बातमी जाण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली होती. सगळया वृत्तपत्रांचे मथळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असे असताना भलतेच घडले होते. पुढचा इतिहास आपण अनुभवतो आहोत.

धनंजय मुंडे हे शरद पवार यांच्याकडे परत आले की कोणाचा दबाव होता? म्हणून नाईलाजास्तव परत आले? त्या दिवशी नेमका अजित दादांचा फोन होता की भाजपमधील राज्यातील सर्वोच्च नेत्याचा? तुम्ही तरुण आहात, अजून खुप राजकारण करायचे आहे, या भानगडीत पडू नका, असे सांगणारा ताकदवान उद्योगपती कोण? 


I have to find these missing links and I will do it..
– विवेक भावसार

Editor,

TheNews21.com

9930403073

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here