@maharashtracity

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा रश्मी शुक्ला यांना सवाल

मुंबई: रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते असा दावा केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik)यांनी शंका जपस्थित केली आहे. रश्मी शुक्ला यांनी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल त्यांनी केला आहे.

रश्मी शुक्लांच्या वकीलांनी कोर्टात शासकीय परवानगी घेऊन फोन टॅप केल्याचे सांगितले आहे. मात्र फोन टॅप दिशाभूल करुन परवानगी घेण्यात आली आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या असेही नवाब मलिक म्हणाले.

पुण्याच्या पोलीस आयुक्त (Pune CP) असताना त्या काळातील खासदार (MP), नेते यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आधीपासूनच आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here