@maharashtracity

धुळे: ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी सुरू असलेला लढा कोणत्याही एका जाती, धर्मापुरता मर्यादित नाही. ओबीसींमध्ये ३९१ जातींचा समावेश होतो. स्वत:ला समाजाचे नेते म्हणणारे संकटाच्या काळात घरात बसून आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना मत देऊ नका. आरक्षण मिळवण्याची ही लढाई सर्वांनी एकत्र येत लढावी, असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी केले.

धुळे शहरातील गल्ली क्रमांक दोनमधील तेली भवनात जिल्हा तिळवण तेली समाजातर्फे आरक्षण प्रश्नी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवारी जिल्हास्तरीय बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.

तेली समाजाचे अध्यक्ष तथा माजी महापौर भगवान करनकाळ अध्यक्षस्थानी होते. यावेळी ऍड. प्रतीक कर्डक, माजी आमदार शरद पाटील, सुनील नेरकर, माजी महापौर जयश्री अहिरराव, कल्पना महाले, नगरसेविका प्रतिभा चौधरी, डॉ. भूषण चौधरी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ, समता परिषदेचे सतीश महाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चितोडकर, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष भीमा वारुडे, मल्हार सेनेचे मनोज गर्दे, मल्हार युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अण्णा खेमनार, शिंपी समाजाचे अध्यक्ष भालचंद्र भांडारकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, शहराध्यक्ष गोपाल देवरे, दिलीप देवरे, जगदीश देवपूरकर आदी उपस्थित होते.

बाळासाहेब कर्डक म्हणाले की, न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ५६ हजार जागा रद्द होणार आहेत. राजकीय आरक्षण गेले असल्याने भविष्यात सामाजिक, शैक्षणिक आरक्षणाबाबतही हाच नियम लावला जाऊ शकतो. अजूनही ओबीसी समाज झोपलेला आहे. ओबीसी समाजाला कुणीही गृहीत धरू नये. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांनी संघटित व्हावे. समाजातील नेत्यांनी आता पुढे येण्याची गरज आहे.

आरक्षणाची ही लढाई जनसामान्यांची व विचारांची असल्याचे ते म्हणाले. माजी आमदार शरद पाटील म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्ष, समाजाची ही लढाई नाही. काहींना आरक्षणाची गरज नसली तरी इतर समाजाला त्याची गरज आहे. त्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात येत आहे.

तेली समाजाकडून उभारण्यात येणार्‍या लढ्याला कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले. राजेंद्र महाले, युवराज चौधरी, सुनील महाले, महादू चौधरी, मोतीलाल चौधरी, रघुनाथ चौधरी, रामेश्वर चौधरी, अरुण महाले, निरंजन करनकाळ, नरेंद्र चौधरी, कैलास चौधरी, तेली समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पना चौधरी, मीना करनकाळ, मंगला चौधरी, लीना करनकाळ, आरती महाले, स्मिता महाले, कविता चौधरी, वंदना चौधरी, निर्मला चौधरी, सरला चौधरी, रिटा बागुल, दीपाली चौधरी, सपना चौधरी, रूपाली महाले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here