maharashtracity

धुळे: शहराजवळील हरणमाळ तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मकरंद अजय पावटे (वय २२) रा.वक्रतुंड सोसायटी, वाडीभोकर रोड, देवपूर धुळे असे मतय तरुणाचे नाव आहे. महापालिकेचे कर्मचारी हेमंत पिराजी पावटे यांचा तो पुतण्या होता.

रविवार दि. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी मकरंद पावटे हा तरुण हरणमाळ तलावात बुडाल्याचे समोर आले, त्याची माहिती कुंटूबियांना समजताच हेमंत पावटे आणि मित्र मंडळी आदि हरणमाळ तलाव परिसरात पोहचले.

काही पट्टीच्या पोहणार्‍यांच्या मदतीने मकरंदचा शोध घेण्यात आला मात्र त्याचा शोध लागला नाही. रात्र झाल्याने आज सोमवारी सकाळी पुन्हा शोध कार्य करण्यात आले. एस.डी.आर. एफच्या पथकाने शोध कार्य करीत तलावाच्या पाण्यात गळ टाकला, या गळात अडकून मकरंद याचा मृतदेह बाहेर काढला गेला.

त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात हेमंत पावटे यांनी दिलेल्या खबरीवरुन घटनेची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here