मुंबई
महाराष्ट्रातील (Maharashtra) करोना (coronavirus) स्थिती अत्यंत वाईट आहे. रुग्णसंख्या आणि मृत्यू यात मोठी वाढ झाली आहे. अशा वेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) घटकपक्ष असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे राज्यातील करोना अपयशाचे खापर मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यावर फोडत आहे, असे वक्तव्य करून विरोधी पक्ष नेते (LoP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज शिवसेना आणि काँग्रेस मध्ये राजकीय दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात आणि मुंबईत (Mumbai) करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळी सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यायला हवे. परंतु, या सरकारमध्ये समन्वय नाही. 

ते म्हणाले, राहुल गांधी यांनी तर करोना संकटावर मात करण्याच्या जबाबदारीपासून पळ काढत आहे. गांधी यांनी स्वतःच्या पक्षावरील जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे.


हे महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या कर्माने पडणार आहे. त्यासाठी आम्हाला राजभवनची (Raj Bhavan) मदत घेण्याची गरज नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.


दरम्यान, महाराष्ट्रात सरकार चालवण्याची प्रमुख जबाबदारी आमच्यावर नाही, आम्ही प्रमुख घटक पक्ष नाही, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी आज दिल्लीत (Delhi) केले. आमच्या पक्षाने आघाडी सरकारला केवळ पाठिंबा दिला आहे, असेही गांधी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here