मुंबई
महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुख्यमंत्री (Former CM) आणि विद्यमान महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री (PWD Minister) अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना उपचारासाठी नांदेड (Nanded) येथून मुंबईत (Mumbai) दाखल करण्यासाठी एअर अम्ब्युलन्स (Air Ambulance) नाकारणारा ‘तो’ अधिकारी कोण? याबाबत मंत्रालयीन (Mantralaya) अधिकारीवर्गात चर्चा आहे. तर काँग्रेसमध्ये (Congress) प्रचंड नाराजी आहे.

‘या’ अधिकाऱ्यावर राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (IAS Officer) वर्गात नाखूष आहेत. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याला थेट नकार देण्याचे धाडस हा अधिकारी कसा करू शकतो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अशोक चव्हाण यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती चव्हाण यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली होती. तरीही पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी नांदेड ते मुंबई प्रवासासाठी एअर अम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी यासाठी चव्हाण यांच्या कार्यालयाकडून मंत्रालयात ‘त्या’ अधिकाऱ्याला संपर्क साधण्यात आला. परंतु, ‘एपीडिमिक’ कायद्यात (Epidemic Act) रुग्णाला एअर अम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची तरतूद नाही,” असे उत्तर देऊन या अधिकाऱ्याने चव्हाण यांच्यासाठी करण्यात आलेल्या मागणीला केराची टोपली दाखवली, असा दावा या घडामोडीत सहभागी असलेल्या व्यक्तीकडून करण्यात आला आहे. चव्हाण हे विद्यमान सरकारमध्ये मंत्री आहेत, याची आठवण करून दिल्यावरही या अधिकाऱ्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे माहितगार व्यक्तीने सांगितले. 

हा अधिकारी ऐकत नाही असे दिसताच चव्हाण यांच्या कार्यालयाकडून ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निरदर्शनास आणून देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनीही या अधिकाऱ्याला चव्हाण यांच्यासाठी एअर अम्ब्युलन्स उपलब्ध करून द्या, असे निर्देश दिले. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही या अधिकाऱ्याने जुमानले नाही.

विद्यमान अर्थमंत्री (Finance Minister) अजित पवार (Ajit Pawar) पाच वर्षांपूर्वी ऊर्जा मंत्री असतांना हा अधिकारी त्यांच्या गळ्यातील ताईत होता असे म्हटले जाते. या अधिकाऱ्याने नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मर्जी जिंकली होती. परंतु, भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) आघाडी सरकारच्या अखेरच्या काळात हा अधिकारी फडणवीस यांचेही ऐकत नव्हता, अशी मंत्रालयात कुजबुज आहे.

विद्यमान मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सल्लागारांनी सल्ला दिला होता की या अधिकाऱ्याला महत्वाच्या पोस्टवर ठेवू नका. परंतु, ठाकरे यांनी ऐकले नाही आणि याच अधिकाऱ्याच्या अरेरावीमुळे मुंबईत करोना संकट ( crisis) हाताबाहेर गेल्याची चर्चा आहे. ठाकरे यांच्यावर या अधिकाऱ्याचा इतका जबरदस्त पगडा आहे की त्यासाठी ठाकरे यांनी प्रशासनातील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी ओढवून घेतली आहे, अशी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here