@maharashtracity

दररोज २ हजार किलो कच-यापासून २५० ते ३०० युनिट वीज निर्मिती

त्या’ विजेचा उद्यानात व कचरा विलगीकरण केंद्रात होणार वापर

मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) पाण्यापासून वीज निर्मिती (electricity generation from water) करण्याचा पहिला छोटेखानी प्रकल्प तानसा तलाव परिसरात यशस्वीपणे राबवला आहे. आता हाजीअली परिसरात पालिकेच्या जागेत कचऱ्यापासून वीज निर्मिती (power generation from solid waste) करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे पर्यटन, पर्यावरण व पालक मंत्री आदित्य ठाकरे (Environment minister Aaditya Thackeray) यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले आहे

याप्रसंगी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, समाजवादी पक्षाचे गटनेते, आमदार रईस शेख, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त विजय बालमवार, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, घन कचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता अशोक यमगर, एरो केअर या संबंधीत सेवापुरवठादार कंपनीचे अंकित जव्हेरी आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पात, दररोज २ हजार किलो कचऱ्याचा वापर करुन वीज निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये, दररोज सुमारे २५० ते ३०० युनिट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

अशी होणार कचऱ्यापासून वीज निर्मिती

या प्रकल्पांतर्गत दररोज २ हजार किलो कचऱ्यापासून प्रथम गॅस निर्मिती करण्यात येईल. त्यानंतर या गॅसचा उपयोग करुन जनित्राच्या आधारे वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पातून दररोज साधारणपणे २५० ते ३०० इतके युनिट वीज निर्मिती होणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात पालिकेच्या एका उद्यानात व घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या एका कचरा विलगीकरण केंद्रात या वीजेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पालिकेच्या वीज खर्चात काही प्रमाणात बचत होण्यासह कचरा वाहून नेण्याच्या खर्चातदेखील बचत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here