जालन्याचे राजेश राठोड यांना संधी, परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सत्तेवर आल्यापासून गेल्या सहा-सात महिन्यात पक्षाला न्याय न देऊ शकलेले ‘निष्ठावंत’ (Loyalist) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शिफारस केलेले नावे डावलून काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी जालन्यातील (Jalna) राजेश राठोड (Rajesh Rathod) या नवख्या उमेदवाराला विधान परिषदेची (Upper House) उमेदवारी दिली आहे. राठोड यांच्या नावाची शिफारस राज्यसभेवर (Rajya Sabha) नुकतेच बिनविरोध निवडून गेलेले राजीव सातव (Rajeev Satav) यांनी केली होती. हा निर्णय घेऊन सोनिया गांधी यांनी पक्षात यापुढे तरुण नेतृत्वाला प्राधान्याने संधी दिली जाईल, हे सुचवले आहे. त्याचवेळी प्रभावहीन ठरलेल्या निष्क्रिय निष्ठावंत यांना यापुढे दिल्लीत (Delhi) स्थान नसेल आणि वारंवार निवडणूकीत पराभूत झालेल्या नेत्यांचे मागील दाराने राजकीय पुनर्वसन (Political Rehabilitation) केले जाणार नाही, हे देखील सोनिया गांधी यांनी आज अधोरेखित केले आहे.

विधान परिषदेच्या ९ रिक्त जागेसाठी होणारी निवडणूक काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाच्या आग्रहामुळे बिनविरोध होणार की पक्षाकडून दोन उमेदवार दिले जाऊन निवडणूक लादली जाणार या प्रश्नाचे उत्तर आज मिळाले आहे. सत्ता स्थापन करतांना सोनिया गांधी आणि विद्यमान मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात झालेल्या सुसंवादचा प्रभाव सोनिया गांधी यांच्या आजच्या निर्णयात दिसून आला आहे. एवढेच नव्हे तर आजही सोनिया गांधी याच्या लेखी राष्ट्रवादी कॉग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे असलेले राजकीय महत्व आणि पवार सांगतील तेच महाराष्ट्रात घडेल, हे देखील अधोरेखित झाले आहे.

Rajesh Rathod

विधान परिषदेच्या ९ जागेसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही होते. यासाठी भारतीय जनता पक्षाला (BJP) ४, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (Shiv Sena) प्रत्येकी २ तर काँग्रेसने एक उमेदवार द्यावा, अशी रणनीती आखण्यात आली होती. परंतु, काँग्रेसचे राज्यातील नेतृत्व दोन जागा लढण्यासाठी आग्रही होते.

विधीमंडळ पक्षनेते, राज्याचे महसूल मंत्री (revenue minister) आणि प्रदेश अध्यक्ष अशी तीन जबाबदारी पेलतांना सोनिया गांधी यांचे निष्ठावंत असलेले बाळासाहेब थोरात यांनी दमछाक होत असल्याची तक्रार पक्षातीलच अन्य नेत्यांकडून केली जात होती. विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीतून राज्यातील नेतृत्वात बदल केले गेले. त्यात अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना हटवून थोरात यांना प्रदेशाध्यक्ष केले गेले. तर त्यांच्या जोडीला कार्यकारी अध्यक्ष या नावाने पाच नेत्यांची टीम दिली गेली. या कार्यकारी अध्यक्षांपैकी यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), डॉ नितीन राऊत (Dr Nitin Raut) आणि विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या पक्षांचे महाविकास आघाडी (MVA) सरकार स्थापन झाल्यावर पक्षात मरगळ आल्याची चर्चा टिळक भवनात होत असे.

पराभूत उमेदवारांचे पुनर्वसन नामंजूर

तशात परिषदेच्या निवडणुकीत थोरात यांनी सलग दोन-तीन निवडणूक हरलेल्या नेत्यांना संधी द्यावी अशी शिफारस पक्ष नेतृत्वाकडे केली होती. मिळालेल्या माहितीनुसार थोरात यांनी मोहन जोशी (Mohan Joshi), कल्याण काळे (Kalyan Kale) आणि मुझफ्फर हुसेन (Muzaffar Hussain) यांच्या नावाची शिफारस केली होती. तर माजी मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याचे विश्वासू पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, डॉ नितीन राऊत, अहमद पटेल (Ahmed Patel), मुकुल वासनिक (Mukul Vasnik) या नेत्यांनीही पराभूत उमेदवाराला परिषदेवर संधी मिळावी, अशी शिफारस केली होती. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी ही सर्व नावे फेटाळून नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.

सातव नवे प्रदेशाध्यक्ष?

थोरात यांच्याकडे तीन पदे असल्याने ते कुठल्याही पदाला व्यवस्थित न्याय देऊ शकत नाही, अशी दिल्लीची धारणा झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात संघटना पातळीवर फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यावेळी थोरात यांना प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मोकळे केले जाईल आणि ही जबाबदारी राजीव सातव या तरुण नेत्याकडे सोपवली जाऊ शकेल, अशी माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली. सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) ज्येष्ठ नेते कमलनाथ (Kamal Nath) यांची मर्जी संभाळतांना तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांच्या नाराजीकडे दिल्लीचे (Delhi) दुर्लक्ष झाले आणि त्यातून पुढे राज्यातील सत्ता गमवावी लागली. हा अनुभव ताजा असतांना महाराष्ट्रात सातव यांच्याकडे नेतृत्व सोपवताना पक्षात यापुढे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या शब्दाला वजन असेल आणि नवीन नेतृत्व पूढे केले जाईल, याचे संकेत सोनिया गांधी यांनी दिल्याचा दावा सूत्रांनी केला.

कोण आहेत राजेश राठोड?

राजेश राठोड हे जालना जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) माजी सभापती आहेत. त्यांचे वडील धोंडीराम राठोड हे स्वर्गीय विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या कारकिर्दीत विधान परिषदेचे आमदार होते. बंजारा (Banjara) समाजात उत्तम जनसंपर्क असलेले राजेश राठोड हे राजीव सातव यांचे विश्वासू मानले जातात. काँग्रेसने याआधी भाजपातून पक्षात आलेले विदर्भातील बंजारा समाजातील नेते हरिभाऊ राठोड यांना विधान परिषदेवर घेऊन आमदार केले होते. मात्र, त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसमध्ये बंजारा समाजाला प्रतिनिधित्व राहिले नव्हते. विधानसभा निवडणुकीतही या समाजातील उमेदवार देण्यात आला नाही. त्याची भरपाई आता परिषद निवडणुकीत भरून काढण्यात आली आहे, अशी माहिती बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्यातील काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी कल्याण दळे (Kalyan Dale) यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here