By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: दादर येथील शिवसेना भवनात झालेल्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय खेड्यापाड्यात, ग्रामीण भागात तसेच तळागळात पोहचवा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच १८ जूनला मुंबईत पदाधिकारी यांचा मेळावा घेणार असल्याचे देखील उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. या बैठकीला शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

गाफील राहू नका

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर ठाकरे गटाकडून राजकीय हालचालींना वेग आला आहे. बुधवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभेसह महापालिका निवडणुकांवर चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत पुढील निवडणुकांवर रणनिती ठरवण्यात आली. तसेच जून १८ तारखेला पदाधिकारी यांचा मेळावा घेणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

ठाकरे गटाला धक्का

ठाकरे गटाची गुरुवारी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीआधी उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी कालच शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी शिवसेना नेते विजय शिवतारे हे सुद्धा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here