@maharashtracity

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणारे बडनेराचे (अमरावती) आमदार रवी राणा यांचा शिवसेनेचे पनवेल उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. (Sena’s Prashant Jadhav criticise MLA Ravi Rana)

आमदार रवी राणा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करतात. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्रीच्या (Matoshree) बाहेर वृक्षारोपण आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.

आज एका फेसबुक लाईव्हमध्ये (Facebook live) बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केले होते. याच टीकेला शिवसेना (Shiv Sena) नवीन पनवेल (Panvel) उपविभागप्रमुख प्रशांत जाधव यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

जाधव म्हणाले, “रवी राणा तुझी लायकी काय आणि तु बोलतो किती? कोण आहे हा रवी राणा आम्ही ओळखतं नाही. असल्या फालतू लोकांना आम्ही किंमत देत नाही. स्वतःला मोठं करण्यासाठी अशी काही मंडळी आपल्या नेत्यांच्या समोर सत्ताधाऱ्यांवर टीका टिप्पणी करत असतात. अशा लोकांना आम्ही जास्त महत्त्व देत नाही.” यापुढे रवी राणांनी आपल्या लायकी मध्ये राहावे असा इशाराही प्रशांत जाधव यांनी दिला आहे.

“या बाटग्यांनी सरकारविरोधात बोलावे किंवा सल्ले द्यावेत, हा विनोदच म्हणावा लागेल. कुणीतरी एक बोगस रवी राणा पुढे करून सरकारवर भुंकत आहे. कोण कुठले हे राणा यापुढे तोंड सांभाळून वापरा अन्यथा शिवसैनिक थोबाड फोडतील”, असा इशारा प्रशांत जाधव यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here