Twitter : @maharashtracity

मुंबई
गोविंदा रे गोपाळ असे म्हणत नऊ ते दहा थरांचे मानवी मनोरे रचून थरांची स्पर्धा गोविंदा पथकांकडून केली जाते. हेच थर रचताना काही वेळा गोविंदा थरातून कोसळतो आणि जखमी होतो. त्याला तातडीने रुग्णालयात हलवून उपचाराची गरज भासते. त्यामुळे उपचारात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी नायर, सायन आणि केईएम रुग्णालयात बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक जखमी गोविंदाला तातडीने बेड मिळणे शक्य होणार आहे.

कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या दहीकाला उत्सवाची तयारी गोविंदा पथकांकडून सुमारे एक महिना आधीपासूनच सुरू होते. नऊ ते दहा थरांचे मनोरे रचत मुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणी ही गोविंदा पथके आपली कला सादर करतात. मात्र, अशातच काहीशा नजरचुकीमुळे रचलेला पूर्ण मनोरा कोलमडतो आणि गोविंदा जखमी होतात. या जखमी गोविंदांना तातडीने उपचाराची गरज लागते. जखमी गोविंदांना तातडीने उपचार मिळावे त्यासाठी महापालिकेची मुख्य रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायन, नायर आणि केईएम रुग्णालयात विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

यात केईएम रुग्णालयात एचडी म्हणजेच हाय डेफिनेशन युनिटमध्ये ७ बेड तर इमर्जन्सी वॉर्डमध्ये ५ बेड राखून ठेवण्यात आले आहेत. सायनमध्ये जखमी गोविंदांसाठी दहा तर नायर रुग्णालयात पाच बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यासोबत सर्व गरजेच्या वस्तू मलम, प्लास्टर, प्रथमोपचारासाठीची साहित्य देखील वॉर्डमध्ये पुरवण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here