Twitter : @maharashtracity

मुंबई

मुंबई महापालिकेतर्फे सध्यातरी करवाढीचा कोणताही प्रस्ताव नाही, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम १५४ (१क) मधील तरतुदींनुसार बृहन्मुंबईतील जमिनी व इमारतींच्या भांडवली मूल्यात दिनांक १ एप्रिल २०२० पासून बदल करणे महानगरपालिकेस बंधनकारक होते. तथापि, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा बदल करणे वेळोवेळी झालेल्या शासन निर्णय व अधिनियमातील बदल यामुळे पुढे ढकलण्यात आले होते.

मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम १५४ (१क) व १५४ (१ड) मधील तरतुदींनुसार बृहन्मुंबईतील जमीन व इमारतींच्या भांडवली मुल्यात दिनांक १ एप्रिल २०२३ पासून बदल करून वर्ष २०२३-२४ करिता मालमत्ता कराची देयके निर्गमित करणे महानगरपालिकेस बंधनकारक आहे. भांडवली मूल्य निश्चितेचे नियम तयार करणे यादृष्टीने प्राथमिक अभ्यास महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आला आहे. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून नियम निश्चितीकरिता खात्याअंतर्गत समिती तयार करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या करवाढीबाबतच्या बातम्या निराधार आहेत. तसेच मसुदा तयार करण्याचे कोणतेही काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे विविध माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या या जनमानसात दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे स्पष्टीकरण बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here