जामनगर : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री-वेडिंग गुजरातमधील जामनगर येथे पार पडत आहे. आज प्री-वेडिंग सेलिब्रेशनचा तिसरा दिवस आहे. पहिली थीम टस्कर ट्रेल्स आहे. ज्यामध्ये पाहुण्यांसाठी दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री पाहुण्यांसाठी नृत्य आणि गाणे सादर केले जाईल. ज्याचा ड्रेस कोड हेरिटेज इंडियन आहे.

२ मार्च हा कार्यक्रमाचा दुसरा दिवस होता. या दिवशी पाहुण्यांना दुपारी जंगल सफारीचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्रीच्या कार्यक्रमात नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी डान्स परफॉर्मन्स दिला. यावेळी सलमान खान-शाहरूख खान आणि आमिर खान पहिल्यांदाच स्टेजवर एकत्र डान्स करताना दिसले. याशिवाय गरोदर दीपिका पादुकोण हिने पती रणवीर सिंहसोबत डान्स परफॉर्मन्स दिला.

https://www.instagram.com/reel/C4BpMWCSoCN/?utm_source=ig_embed&ig_rid=dbd1fe00-885f-42ed-a493-ede6998cf5c1

याशिवाय मार्क झुकरबर्ग आणि बिल गेट्स सारखे अनेक परदेशी पाहुणे पारंपरिक भारतीय पोशाखात दिसले. अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमधील बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शाहरूख होस्टिंग करताना दिसत आहे. मंचावर येताच त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या.

संगीत रात्रीच्या एक दिवस आधी जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये आंतरराष्ट्रीय पॉप स्टार ‘रिहाना’ पोहोचली होती. रिहाना जगातील सर्वात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. तिच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. अंबानी कुटुंबातील हे आतापर्यंतच महागडं लग्न असल्याचं म्हटलं जात आहे. या लग्नात १००० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here