मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्याच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आहे. अनंत-राधिकाची प्री-वेडिंगच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहेत. या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या सगळ्यामध्ये अनंत अंबानींचा एक फोटोही व्हायरल होत असून ज्यात त्याचे वजन खूप वाढलेले होते.

कारण काही वर्षांपूर्वी अनंत अंबानीने तब्बल १०८ किलो वजन कमी केलं होतं. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला होता तर अनेकांनी त्याचं कौतुकही केलं होतं. 18 महिन्यांत 108 किलो वजन कमी करून त्याने काहीही अशक्य नसल्याचं सिद्ध केलं होतं. अशा परिस्थितीत जेव्हा लोकांनी त्याचा वजन वाढलेला फोटो पाहिला तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. अनंतचे वजन पुन्हा कसे वाढले हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनंत अंबानीची आई नीता अंबानी यांनी 2017 मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांच्या मुलाला दम्याचा गंभीर त्रास आहे. त्यामुळे त्याला खूप स्टिरॉइड्स दिले जात होते. परिणामी अनंतचे वजन पुन्हा वाढले.

दम्याच्या उपचारात स्टेरॉईड औषधांचा वापरामुळे श्वसनाच्या नलिका उघडण्यास मदत होते. ज्यामुळे श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. मात्र याचे दुष्परिणाम देखील होतात. ज्यात वजन वाढतं. दीर्घकालीन वापरामुळे काही लोकांमध्ये वजन वाढू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्टेरॉइड औषधांच्या वापरामुळे चयापचय गती कमी होते ज्यामुळे अन्न लवकर पचत नाही आणि वजन वाढते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here