@maharashtracity
मुंबई: अमेरिकेच्या जेबिल कंपनीने महाराष्ट्रात सुमारे दोन हजार कोटी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये कंपनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे.
याच अनुषंगाने आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत कंपनीच्या प्रतिनिधींनी वेबिनारद्वारे चर्चा केली.
इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीत जेबिल कंपनी आघाडीवर आहे. महाराष्ट्रात स्मार्ट फोन, मोबाईलचे सुटे भाग, स्मार्ट गृहपयोगी वस्तू, अन्न व खाद्यपदार्थाचे वेष्ठन निर्मित आदी क्षेत्रात आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. याद्वारे सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून सुमारे १३ हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये प्रकल्प सुरू करण्याच मानस कंपनीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.
जेबिल कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक व विस्तार करण्याची तयारी दर्शवली आहे. कंपनीला रेडीशेड, जमीन व इतर सुविधी प्राधान्यांने दिल्या जातील असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.