@maharashtracity

शेलार,जाधव !! मनीष,सतीश !!
मनसुख बसले !! गाडीत !! १!!

चौकडी चांडाळ !! होती सोबतीला !!
वाझे नि शर्मा !! ‘जोडी’त !! २!!

रचून सापळा !! नेम बंदुकिचा !!
वेध सावजाचा !! मनसुख !!३!!

मिटले डोळे !! सुटले ग्रहण !!
निश्वास टाकला !! ‘टोळी’त !!४!!

होता वरदहस्त !! वागले बिनधास्त !!
‘एन्काऊंटर’ फेम !! ‘वाझे !!५!!

टीम’एनआयए’ची !! गाडी स्फोटकाची !!
आता विरोधकांनाही !! ‘साजे’ !!६!!

एन्काऊंटर बहुत !! असतीलही केले !!
प्रसिद्धी अमाप !! ‘शर्मा’ची !!७!!

घटिका समीप !! आलीच पाहा !!
बेपर्वाईने केलेल्या !! ‘कर्मा’ची !!८!!

  • By संतोष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here