@maharashtracity

मुंबई: राज्यात गुरुवारी २२९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७८,७२,०३२ झाली आहे. गुरुवारी ३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२२,३६० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१०% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,९०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच राज्यात गुरुवारी ३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८८,४०,२०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७२,०३२ (०९.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत ७३ बाधित

मुंबई (Mumbai) महानगरपालिका क्षेत्रात ७३ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,५६,५३६ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६९३ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here