@maharashtracity

मुंबई: राज्यात सोमवारी ४,५०५ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,५७,८३३ झाली आहे. आज ७,५६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५१,९५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६८,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच राज्यात सोमवारी ६८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९७,२५,६९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,५७,८३३ (१२.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,२१,६८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात २१८

मुंबईत (Mumbai) दिवसभरात २१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३७७१५ एवढी झाली आहे. तर ३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५९५४ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here