@maharashtracity

अन्न व औषध प्रशासन विभागाची तिसरी कारवाई

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) अवैध कारवायांवर कारवाईचा बडगा उगारून देखील औषधांवरील आक्षेपार्ह जाहिराती करणे सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उजेडात आले. यावेळी अन्न व औषध विभागाने आक्षेपार्ह जाहिरात कंपन्यांवर पुन्हा एकदा कारवाई करून ४८ लाखांचा साठा जप्त केला आहे. ही तिसरी कारवाई असल्याचे सांगण्यात आले.

यात मायफेअर क्रिम उत्पादक मे. झी लॅबरोटरीज लिमिटेडच्या पोआंटा माहिब हिमाचल प्रदेश या औषधांच्या आवरणावर ’अविश्वसनीय सौंदर्यता‘ तर त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर ’त्वचेचा रंग उजाळणे‘ अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आले होते.

अशा प्रकारची जाहिरात करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९०० नियमांचे उल्लंघन करणारे ठरत आहे. त्यामुळे औषध निरीक्षक प्रशांत आस्वार व रासकर यांनी भिवंडी येथील गोडाऊनवर धाड टाकली. या धाडीत आक्षेपार्ह मजकूर असलेल्या मायफेअर क्रिम या औषधाचा एकूण १० लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला.

तर नागपूर येथील दुसऱ्या छाप्यात औषध निरीक्षक महेश चौधरी यांनी कारवाई करत सुमारे ३४ लाखाचा औषधी साठा जप्त केला. यापकरणी पुढील तपास सुरु असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले.

Also Read: दादर, धारावी, माहिममध्ये एका महिन्यात कोरोना रुग्ण संख्येत ६०% घट

औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादकांनी औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ व नियम १९५५ आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ यांच्या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या जाहिराती प्रसिध्द करु नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आक्षेपार्ह जाहिराती आढळल्यास अन्न व औषध प्रशासनास हेल्पलाईन क्रमांक१८००२२२३६५ वर संपर्क करावा असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here