@maharashtracity

आशा कार्यकर्ती संघटनेची वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत बैठक

मुंबई: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NRHM) राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागा आशा (ASHA) योजनेची अंमबलजावणी सुरु आहे. या आशा कार्यकर्तींना पीआयपी (PIP) संवर्गावर आधारित मोबदला दिला जातो. शिवाय त्यांच्या मोबदल्याचे नियोजन ते काय करावे अशा अनेक प्रश्नांवर आरोग्य सेवा व अभियान संचालक आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याची बैठक बोलावली आहे.

मात्र, हा मोबदला नियमित नसून वारंवार सुचना करुनही प्रलंबित ठेवण्यात येत असतो असे महाराष्ट्र गटप्रवर्तक व आशा स्वयसेविका संघटनांचे म्हणणे आहे. या बैठकीला संघटनेचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. ही बैठक २१ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार असून लेखा व्यवस्थापक देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, प्रलंबित मोबदल्याबाबत प्रमुख प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघटना अध्यक्ष एम ए पाटील तसेच खजिनदार राजेश सिंग यांनी सांगितले. आशा कार्यकर्ती यांना शासनाकडून सापत्न भावाची वागणूक दिली जात असल्याचे आशा कार्यकर्तींकडून सांगण्यात आले.

ग्रामीण भागासह शहरातही आशा कार्यकर्ती काम करत असतात. दरम्यान, मुंबई व मुंबई परीसरातील महानगरपालिका क्षेत्रातील आशांना केंद्र व राज्य शासनाचा मोबदला अदा करण्यात येत नसल्याच्या तक्रारी आशा संघटनाकडून प्राप्त होत आहे. त्यामुळे आशांच्या कामावर आधारीत मोबदल्याचा संघटनेच्या प्रतिनिधी समवेत आढावा घेण्याकरीता महानगरपालिका क्षेत्रातील शहर लेखा व्यवस्थापकांची एक दिवसीय बैठक २१ फेब्रुवारी रोजी समिती कक्षात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत २०२१-२२ आर्थिक वर्षात नियमित बाबींचा महिना निहाय व आशानिहाय किती मोबदला अदा करणे अपेक्षित होते, तसेच किती मोबदला अदा करण्यात आलेला आहे. शिवाय २०२१-२२ या आर्थिक वर्षात महिना निहाय व आशानिहाय किती मोबदला अदा करणे अपेक्षित होते व किती मोबदला अदा करण्यात आला आहे. याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

तसेच २१ एप्रिल ते ऑक्टोबर कालावधीतील मोबदला अद्याप किती देण्यात आला. तसेच याच कालावधीतील कोविड मोबदला देण्यात आला कि नाही असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here