@maharashtracity

गुन्हे मागे घ्यावेत

भाजप ओबीसी मोर्चाची मागणी

धुळे: शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची भुमिका घेतली आहे. मात्र, गुन्हे दाखल करताना दुजाभाव होत असल्याची तक्रार भाजपचे ओबीसी मोर्चा (BJP OBC Morcha) प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

या संदर्भात भाजपने अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्याने समाजावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भाजपा राज्यभर आंदोलन करीत आहे. मात्र कुठेही गुन्हा दाखल झाला नाही.

धुळे शहरात पोलिसांनी महापौरांसह 30 पदाधिकारी व नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला. भाजपा आंदोलकांवर ज्या कलमान्वये गुन्हा दाखल केला त्या कलमांची पायमल्ली नंतर शिवसेनेने (Shiv Sena) केली असून आयएमआयएमच्या (MIM) आमदारांनी हजारोच्या संख्येने विना परवानगी मोर्चा काढला. मात्र त्यांच्यावर आजतागायत कुठलेही गुन्हे दाखल झालेले नाहीत.

केवळ राज्यातील आघाडी सरकारच्या दबावाने धुळे पोलीस (Dhule Police) भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करीत असून हा दुजाभाव का? असा सवाल हिरामण गवळी यांनी विचारला आहे. भाजप कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही अपर पोलीस अधीकांना निवेदन देतांना हिरामण गवळींनी केली. यावेळी भाजपचे रमेश करनकाळ, सुरेश थोरात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here