@maharashtracity

मुंबई: मले ही देवाघरची फुले असतात असं आपण नेहमी म्हणत असतो. पण सध्याचं जग आणि जन्माला येणारी मुले ही एक पाऊल पुढचा विचार करणारी आहेत. त्यामुळे मुलांना त्यांच्या योग्य त्या वयात योग्य ते शिक्षण मिळणं ही तितकच महत्वाचं आहे. सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक शिक्षण हे शाळेमध्ये योग्यप्रकारे शिकवणे किती महत्त्वाचे आहे हेच पटवून देणारा कॅफे मराठी निर्मित “प्रणय मास्तर” हा मराठी चित्रपट येतोय तुमच्या भेटीला. १६ मे रोजी दुपारी १२ वाजता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर शेमारू मराठीबाणा या वाहिनीवर होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन शिरीष लाटकर यांनी केले आहे.

मुलामुलींच्या पौगंडावस्थेत म्हणजेच वाढत्या वयात त्यांच्यात होणारे बदल, त्यांच्या शरीररचनेत होणारे बदल हे का आणि कसे होतात? आणि त्याची जाणीव शालेय जीवनात करून घेणं का महत्त्वाचे आहे हे सांगणारा हा चित्रपट आहे.

या चित्रपटाचे निर्माते आणि कॅफेमराठीचे फाऊंडर निखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन म्हणतात की, आजवर कॅफे मराठीने अनेक मराठी आणि हिंदी वेबसिरीज केल्या आहेत ज्यात अनेक बडे कलाकार दिसून आले आहेत. आता प्रथमच मराठी चित्रपट निर्मिती आम्ही केली आहे. आणि हा अनुभव खूप छान होता. हा चित्रपट तुम्हाला तुमच्या शाळेच्या आठवणींमध्ये नक्कीच रमवेल आणि खूप काही शिकवून जाईल.

“प्रणय मास्तर” या चित्रपटात प्रसाद ओक आणि अर्चना निपाणकर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोबतच प्रणव रावराणे, हंसराज जगताप, शुभम वेदक, शिवानी देशमुख, प्राजक्ता दशपुत्रे हे देखील दिसणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here