@maharashtracity

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: कोविडचा नवा वेरियंट ओमिक्रॉनचा (Omicron) धोका पसरत असताना विमानतळावर येणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी (RT-PCR test) आकारले जाणारे दर कमी करण्याबाबत सतत मागणी होत आहे. हा दर कमी करण्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारही गंभीर आहेत. हा दर २००० रुपयांच्या आसपास येण्याची शक्यता सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली.

विमानतळावरील आरटीपीसीआर टेस्ट दर यावर विषयावर बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत हा दर कमी करण्यावर विचार विनिमय होणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, बुस्टर डोस (booster dose) आणि मुलांना लसीकरण (vaccination) या विषयावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय बोलणार आहेत. आतापर्यंत राज्यात १० ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. तर ६० च्या घरात संशयित ओमिक्रॉन रुग्ण आहेत.

संशयितांचे नमुने जिनॉम सिक्वेसिंग (Genome sequencing) साठी पाठविण्यात आले आहेत. शिवाय राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत मागणी वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यावर विचार विनिमय होणार आहे. विमानतळावरील आरटीपीसआर टेस्ट दर कमी करण्यावर सतत विचार होत असून या चाचण्या वेगळ्या प्रकारच्या आहेत.

एअरपोर्ट चार्ज आणि आरटीपीसीआर टेस्ट असा मिळून हा दर आकारला जात आहे. मागच्या आठवड्यापर्यंत ४५०० रुपये आरटीपीसीआर चाचणीसाठी आकरली जात होती. तर शनिवारी ६०० रुपये कमी करून ३९०० रुपये आकारण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीच्या ५,००० रुपयांवरून २,००० रुपयांच्या आसपास खाली आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असलयाचे टोपे यांनी बुधवारी सांगितले. त्यासाठी बुधवारी सायंकाळी या विषयावर बैठक बोलावण्यात आली होती.

ओमिक्रॉनच्या रुग्णांचे राज्य सरकार ट्रॅकिंग, ट्रेसिंग, चाचणी यासह लसीकरणाला गती देत असल्याचे सांगण्यात आले. सध्या राज्यात मृत्यू दर कमी झाला असल्याचे सांगण्यात आले.

ओमिक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी गुरुवारी बोलावलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये (Video Conferencing – VC) कोविड-१९ लसींचे दोन डोस आणि बूस्टर डोसचे याबाबत माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राज्याची दररोज २० लाख कोविड लसीचे डोस देण्याची क्षमता असून आतापर्यंत, राज्याने १२ कोटींहून अधिक डोस दिले असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळात ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. पात्र व्यक्तींचे कोविड-१९ लसीकरण युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे यांवेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here