मुंबईत दिवसभरात ४८६ रूग्ण 

@maharashtracity

मुंबई: राज्यात  राज्यात ६,७४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,०४,९१७  झाली आहे. काल १३,०२७  रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,६१,७२०  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१६,८२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात सोमवारी ५१  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे. नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. 

एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने  राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ५५ ने वाढली आहे. हे ५५ मृत्यू, सांगली-१९, पुणे-१२, सातारा-७, यवतमाळ-६, बीड-३, नाशिक-३, जालना-१, कोल्हापूर-१, लातूर-१, सोलापूर-१ आणि ठाणे-१ असे आहेत. राज्यात आज  ५१  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  ४,२७,१२,४६० प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६१,०४,९१७ (१४.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,४२,२५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत दिवसभरात ४८६:

मुंबईत दिवसभरात ४८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२५१६१ एवढी झाली आहे. तर १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५५५४ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here