@maharashtracity

मुंबई: सध्या मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णसंख्या (corona patients) सतत घटत आहे. ही घट कायम राहिल्यास फेब्रुवारीअखेर पर्यंत तिसरी लाट संपेल (end of third wave of corona) असा अंदाज आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (Dr Pradeep Awate) यांनी व्यक्त केला आहे. तिसरी लाट आता संपत आली असून आगामी पंधरा दिवसात रुग्णसंख्या तळाला पोहचेल, असे ही डॉ. आवटे म्हणाले.

मात्र, राज्यात २३ जिल्ह्यात पॉझीटिव्हीटी दर (positivity rate) सरासरी पेक्षा अधिक आहे. यावर प्रत्येक जिल्ह्यातील सरासरी एकाच वेळी एकच असणे शक्य नसून कमी अधिक अशी स्थिती राहणार असल्याचे ही ते म्हणाले.

राज्यातील रुग्णसंख्येची स्थिती अशी असताना मुंबईत कमालीची रुग्ण घट सुरु आहे. २९ जानेवारी रोजी मुंबईत १४११ रुग्ण नोंद करण्यात आली होती. मात्र, ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत ४४१ एवढी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली. ही संख्या तिपटीहून कमी घटली असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसात या प्रमाणे रुग्ण घट होत आली. यात ८ फेब्रु. ४४७, ७ फेब्रु. ३५६, ६ फेब्रुू. ५३६, ५ फेब्रु. ६४३, ४ फेब्रु. ८४३, ३ फेब्रु. ८३४, २ फेब्रु.११२१, १ फेब्रु. ८०३, ३१ जाने.९६०, ३० जाने. ११६० अशी घटत गेली.

राज्यातील घटती आकडेवारी पाहिल्यास रुग्ण संख्या कमी झालेली दिसून येईल. यात ३१ जानेवारी १५,१४०, ३० जानेवारी २२,४४४, १ फेब्रुवारी रोजी १४ हजार ३७२, २ फेब्रुवारी रोजी १८ हजार ६७ रुग्ण, ३ फेब्रुवारी रोजी १५ हजार २५२ , ४ फेब्रुवारी रोजी १३ हजार ८४०, ५ फेब्रुवारी रोजी ११ हजार ३९४ रुग्ण, ६ फेब्रुवारी रोजी ९ हजार ६६६ रुग्ण, ७ फेब्रुवारी रोजी ६ हजार ४३६, ८ फेब्रुवारी रोजी ६ हजार १०७ अशी घट नोंदविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here