@maharashtracity

धुळे: इंफाळपासून (Imphal) वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या बिष्णुपुर परिसरात झालेल्या प्रतिहल्ल्यात गोळी लागल्याने जखमी झालेल्या निलेश अशोक महाजन (२१) या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोनगीर (ता.धुळे) येथे शहीद जवान निलेश (Jawan martyr)यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.

नंदुरबार जिल्ह्यातील कळंबू गावातील मूळ रहिवासी असलेले निलेश मराठा युनिटमध्ये कार्यरत होते. सन २०१६ मध्ये नांदेड येथे सैन्य दलात ते भरती झाले आणि एक सप्टेंबर २०१६ मध्ये बेळगाव (कर्नाटक) येथे त्यांनी ट्रेनिंग पुर्ण केले.

यानंतर त्यांची मनिपूर येथे कर्तव्यावर नेमणूक झाली. साधारणपणे सहा महिन्यांपूर्वीइंफाळ पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या बिष्णुपुर परिसरात झालेल्या प्रतिहल्ल्यात गोळी लागल्याने निलेश जखमी झाले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाल्याची बातमी आज येथे पोहोचली आणि गावकऱ्यांनी गर्दी केली.

निलेश यांचे पार्थिव गुवाहाटी वरून धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहे असे सांगण्यात आले.

शाहिद निलेश यांचे वडील स्व.अशोक जगन्नाथ महाजन हे ही आर्मीमध्ये कार्यरत होते. तर काका दिलिप जगन्नाथ महाजन हे लाल चौक, श्रीनगर जम्मू कश्मीर भागात शहीद झाले. 
शहिद जवान निलेश यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत मामांकडे शिक्षण घेतले होते.त्यांचे कुटुंब धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे स्थायिक असून निलेश यांच्या पार्थिवावर येथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती सैनिक कल्याण विभागाचे निवृत्त सुभेदार रामदास पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here