@maharashtracity

राष्ट्रस्तरीय स्पर्धेत स्फोटकं शोधण्यात पदकासह प्रथम पारितोषिक

धुळे: धुळे जिल्हा पोलीस (Dhule Police) दलाच्या जिनी या श्‍वानासह तिला प्रशिक्षण देणार्‍या दोघा पोलिसांना देशातून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्फोटक शोधण्यातही जिनीने सुवर्ण पदक (Gold medal) पटकावले. याकरीता पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी जिनीसह दोन्ही पोलिसांचा बक्षीस देऊन गौरव केला.

Also Read: शिंदखेडा एटीएम चोरी प्रकरणात हरियाणातील चौघांना अटक

तेलंगणा राज्यातील मोयनाबाद येथे झालेल्या राष्ट्रस्तरीय श्‍वान पथक प्रशिक्षण कार्यक्रमात 7 राज्यातून शंभराहून अधिक श्‍वान आले होते. या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत कुठल्याही प्रकारचे स्फोटक (explosive) शोधण्यात जिनीला व तिचे दोन्ही प्रशिक्षक पो.कॉ. मयुर सुर्यवंशी आणि पो.कॉ. जयवंत वाघ यांना प्रथम पारितोषिक मिळाले.

त्याबद्दल पोलीस अधिक्षक प्रविण पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते त्यांचा बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here