@maharashtracity

हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी सतत झटणारा वारकरी गेल्याने हळहळ

धुळे: हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी (Hindu Muslim unity) सतत प्रयत्नशील असणारे प्रसिद्ध कीर्तनकार तसेच वारकरी संप्रदायाचे थोर प्रचारक ह.भ.प. ताजुद्दिन महाराज संभाजी नगरकर यांचा साक्री तालुक्यातील जामदे गावात कीर्तन करीत असतांना सोमवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Tajuddin Maharaj died while performing Kirtan)

व्यासपीठावरच महाराजांनी प्राण सोडल्याने भाविकांनी हळहळ व्यक्त केली.

साक्री (Sakri) तालुक्यातील निजामपूर परिसरातील जामदा गावात सप्ताह सुरु होता. तेथे सप्ताहाच्या सहाव्या दिवशी रात्री ताजुद्दीन महाराज कीर्तन करीत होते. व्यासपीठासमोरचे सर्व भाविक व गावकरी अतिशय मंत्रमुग्ध झाले होते.

किर्तन रंगात आले असतानाच ताजुद्दीन महाराजांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. अचानक महाराज व्यासपीठावर कोसळल्याने अन्य सहकारी मदतीला धावले. यावेळी गावकर्‍यांनी महाराजांना तातडीने नंदुरबार (Nandurbar) येथे उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी महाराजांना मृत घोषित करण्यात आले.

ताजुद्दीन महाराज हे मुळचे जालना (Jalna) जिल्ह्यातील घनसांगवीचे. तेथील बोदलापूरी आश्रमात त्यांचे पार्थीव पाठविण्यात आले. महाराज मुस्लिम (Muslim) समाजात जन्माला आलेले असताना त्यांना वारकरी संप्रदायाची गोडी लागलेली होती.

यामुळे त्यांनी विठ्ठल रुक्माईचे मंदिर उभारले होते. त्यांनी स्वतःला भक्ती पंथात झोकून दिले होते. महाराजांनी व्यासपीठावरच देह त्यागल्याने वारकर्‍यांसह गावकर्‍यांनी हळहळ व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here