@maharashtracity

साखळी उपोषणाचा दहावा दिवस

मुंबई: राज्यातील सर्व सरकारी वैद्यकिय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्रधायपकांचे (temporary assistant medical teachers) जे जे रुग्णालयात साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाची सरकार दरबारी कोणीही दखल घेत नसून कोरोनाच्या महामारीत जीवाची पर्वा न करता रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना उपोषण करावे लागत आहे. हे सरकारचे दुर्देव असल्याचे जे. जे. रुग्णालय, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना अध्यक्ष डॉ. सचिन मुळकुटकर यांनी सांगितले. दरम्यान, अस्थायी वैद्यकीय शिक्षकांच्या साखळी आंदोलनाचा (chain protest) गुरुवारी दहावा दिवस असल्याचे सांगण्यात आले.

अस्थायी वैद्यकीय शिक्षकांनी १७ जानेवारीपासुन आंदोनाला सुरुवात केली. सेवा नियमित करण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. मात्र, डॉक्टरांच्या या साखळी आंदोलनाकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री, सचिव, आयुक्त तसेच संचालक यांनी दुर्लक्ष केले आहे.

दरम्यान, वैद्यकिय शिक्षण मंत्री यांनी सेवा नियमीत करण्याचे आश्वासन दिले असले तरीदेखील या आश्वासनाचा वैद्यकीय शिक्षणमंत्र्याना विसर पडला असल्याची तक्रार आंदोलनकर्ते करतात. रुग्णसेवा होईपर्यंत या अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना खोटे आश्वासन दिले की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वैद्याकिय शिक्षक उच्चशिक्षित असून सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे गेल्या १० दिवसापासुन उपोषण करण्याची दुर्देवी वेळ आली आहे. वैद्यकिय शिक्षण विभागाची दुर्दशा टाळण्यासाठी सरकार सेवा समावेशन करण्याचा निर्णय घेणार का याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here