@maharashtracity

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अध्यादेश जारी

प्रभाग रचनेबाबतचा मसुदा आठवडाभरात सादर होणार

मुंबई: मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक (BMC polls) २०२२ मध्ये होणार आहे. या निवडणुकीबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने जारी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून लेखी सूचना पालिकेला आल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात नव्या प्रभाग रचनेचा मसुदा तयार करून पालिका राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहे.

याबाबतची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली आहे.

राज्य मंत्रीमंडळाने ११ नोव्हेंबर रोजी मुंबईतील नगरसेवक प्रभागांची संख्या २२७ वरुन २३६ करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे ९ प्रभाग म्हणजेच ९ नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.
मात्र याबाबतचा अध्यादेश (ordinance) गुरुवारी २ डिसेंबर रोजी राज्य सरकारने जारी केला आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) शुक्रवारी प्रभाग रचनेबाबत लेखी सूचना मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाला पाठवल्या आहेत. या सुचनांच्या अनुषंगाने पालिका प्रभाग रचना करणार आहे.

मुंबई महापालिकेची मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. तत्पूर्वी नवीन महापौरांची निवड होणे गरजेचे आहे. मात्र निवडणूक प्रक्रियेला काही कारणास्तव उशीर झाल्यास ही निवडणूक फेब्रुवारी २०२२ ऐवजी मार्च अखेर किंवा एप्रिल २०२२ मध्ये होण्याची शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here