@maharashtracity
महाड: प्रजासत्ताक दिनाचे (R-Day) औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक देऊन सन्मान करते. असाच बहुमान आज महाड तालुक्यातील नागाव गावातील रहिवाशी परंतु मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले मिलिंद गणेश नागावकर (Milind Nagaonkar) यांना मिळाला आहे. त्यांना पोलिस पदक प्राप्त झाले आहे.

महाड (Mahad) तालुक्यातील नागाव गावचे सुपुत्र असलेले मिलिंद नागावकर १८/०६/१९८८ रोजी मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) कॉन्स्टेबल या पदावर दाखल झाले. पोलीस दलात काम करत असताना उल्लेखनीय कार्य करीत राहणे हे धोरण त्यांनी सेवेत अवलंबिले.

असेच उल्लेखनीय काम करीत असताना त्यांची मुंबई पोलिस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) मुख्य गुप्त अधिकारी एस. आय. डी. या पदावर उल्लेखनीय काम केले. या उल्लेखनीय कामाची दखल राज्य पोलीस दल व केंद्रीय गृह मंत्रालय (Union Home Ministry) यांनी घेवून त्यांना आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस पदक देण्याचा निर्णय जाहीर झाला. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील पोलिसांना त्याचा आनंद वाटत आहे.

मिलिंद गणेश नागावकर हे महाड तालुक्यातील नागाव गावातील मूळचे रहिवाशी असून ते मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असले तरी त्यांची नाळ गावच्या मातीची कायम राहिलेली आहे. आज त्यांच्या पोलीस पदकाच्या पुरस्कारामुळे गावात आनंद व्यक्त केला जात आहे.