Twitter : @maharashtracity

मुंबई

सलग पाच दिवस सुट्या आल्याने खासगी दवाखान्यात दाखल असलेल्या लहान मुलांना सरकारी रुग्णालयात शिफ्टींग करायला लावले. या शिफ्टींगमुळे लहान मुलांचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. त्यामुळे नांदेडमधील बालकांच्या मृत्यूला खासगी रुग्णालयेच जबाबदार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

तुर्तास नांदेड मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमली असून काही महत्वाचे कठोर निर्णय घेतले जाणार असल्याचे ठरले आहे. सरकारी रुग्णालयातील स्वच्छता आणि डॅाक्टरांच्या बदल्यांबाबत सरकार निर्णय घेणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले. सध्या राज्य सरकारच्या रुग्णालयात चोवीस तासांत झालेल्या नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तुर्तास नांदेड दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवर शुक्रवारी राज्य सरकारकडून उत्तर दाखल करण्यात येणार आहे.

या घटनेत १० लहान मुलांचे मृत्यू झाले होते. या मृत्यूला खासगी दवाखाने जबाबदार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. खासगी दवाखान्यात ५ दिवस सुट्ट्या असल्यामुळे या खासगी रुग्णालयांनी अत्यवस्थ लहान मुलांना सरकारी दवाखान्यात दाखल करायला सांगितले होते, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

तसेच नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुन्हा २४ तासांत आणखी १४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे ४ दिवसांत ५१ मृत्यू झाले आहेत. यापूर्वी अपुरा औषध साठा, परिचारिका, डॉक्टरची रिक्त पदे यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला. ४ ऑक्टोबर रोजी ६ जणांना जीव गमवावा लावला होता. तर गुरुवारी ५ ऑक्टोबरला मागील २४ तासात तब्बल १४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे ४ दिवसात ५१ मृत्यू झाले असल्याचे समोर येत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here