सिंधुदुर्ग

नौदल दिनानिमित्ताने सिंधुदुर्ग येथील तारकर्ली येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. यावेळी शिवरायांना नमन करून नौदलाचा इतिहास बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात मांडण्यात येणार आहे.

सर्वसाधारणपणे नौदलाचा कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित केला जातो. मात्र शिवराज्यभिषेकाच्या ३५० वर्षानिमित्त हा कार्यक्रम सिंधुदुर्गात होणार आहे. यावेळी नौदलाकडून विविध प्रात्यक्षिके तारकर्लीच्या समुद्रात सादर होणार आहेत. यात विमानवाहू युद्धनौका, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, कमांडो कारवाया आदींचा समावेश आहे. आज सायंकाळी ५.१५ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन यांचा आवाज असणार आहे.

मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ वाजता मालवणजवळील राजकोट किल्ल्यावर महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here