@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिका (BMC) जल अभियंता खात्यामार्फत ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह (inlet valves) बदलण्याचे काम २७ जानेवारी रोजी सकाळी १० ते २८ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे बहुतांश झोपडपट्टी परिसर असलेल्या गोवंडी (Govandi), मानखुर्द (Mankhurd), देवनार (Deonar) आणि चेंबूर (Chembur) या परिसरात १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांनी, या कालावधीत पाणी समस्येला तोंड देण्यासाठी अगोदरच आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा व त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

देवनार, गोवंडी, मानखुर्द भागात पाणी बंद

मुंबई महापालिकेच्या, एम/पूर्व विभागातील
प्रभाग क्रमांक १४० – टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग
प्रभाग क्रमांक १४१ – देवनार महानगरपालिका वसाहत, लल्लूभाई कंपाऊंड;
प्रभाग क्रमांक १४२ – लल्लूभाई कंपाऊंड, हिरानंदानी इमारत
प्रभाग क्रमांक १४३ – जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर
प्रभाग क्रमांक १४४ – देवनार गाव रस्ता, गोवंडी गांव, व्ही. एन. पूरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गांव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गांव, गोवंडी स्थानक मार्ग, टि. आय. एफ. आर. वसाहत
प्रभाग क्रमांक १४५ – सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम मार्ग, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा, चिता कॅम्प ट्रॉम्बे
प्रभाग क्रमांक १४६ – देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी नगर, बी. ए. आर. सी. (BARC) फॅक्टरी, बी. ए. आर. सी. (BARC) वसाहत आदी भागात १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

चेंबूर, मैत्रीपार्क, चेंबूर कॅम्प भागात पाणी बंद

प्रभाग क्रमांक १५१ – साईबाबा नगर आणि श्रमजीवी नगर
प्रभाग क्रमांक १५२ – सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तीक पार्क, सिद्धार्थ वसाहत, सुमन नगर
प्रभाग क्रमांक १५३ – घाटला अमर नगर, मोती बाग खारदेव नगर, वैभव नगर, मैत्री पार्क, अतूर पार्क
प्रभाग क्रमांक १५४ – चेंबूर कॅम्प, युनियन पार्क लाल वाडी; प्रभाग क्रमांक १५५ – लाल डोंगर आदी भागात १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here