@maharashtracity

नवीन उत्साहाने पुढील संशोधन करणार –डॉक्टर हिम्मतराव बावस्कर

महाड: केंद्र शासनाने प्रजासत्ताक दिनाच्या (R- day) पार्श्वभूमीवर गेल्या चाळीस वर्षांपासून महाड शहरवासी असलेले आणि कोकणामध्ये विंचू दंशावर संशोधन करून लस तयार करणारे डॉ हिम्मतराव बावस्कर (Padma Shree Dr Himmatrao Bavaskar) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना डॉ बावसकर म्हणाले, आपण गेल्या चाळीस वर्षांपासून केलेल्या कष्टाचे हे फळ आहे. शासनाने दिलेल्या या पुरस्कारामुळे नवीन उत्साहाने आपण पुढील संशोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाड पोलादपूरमधील (Mahad – Poladpur) वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या कामाची सुरुवात पोलादपूर येथील शासकीय रुग्णालयात (government hospital) झाल्याचे सांगून, त्यानंतरच्या काळात महाड येथे सुरू केलेल्या वैद्यकीय व्यवसायाला महाडकर नागरिकांनी केलेले प्रेम व विश्वासामुळेच आजपर्यंतची मजल मारल्याने विनम्रपणे कबूल केले. हा पुरस्कार आता महाडकरांचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाड तसेच कोकणामधील (Kokan) ग्रामीण भागात विंचू दंशाने मृत्युमुखी (death due to scorpion bite) पडलेल्या नागरिकांची झालेली चाळीस वर्षांपूर्वीची स्थिती लक्षात घेऊन आपण या संदर्भात केलेल्या संशोधनाला महाड पोलादपूरमधील नागरिकांनी दिलेली साथ अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. उर्वरित काळात नवीन उत्साहाने या संदर्भातील पुढील संशोधन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here